वाशिम: वडप येथे खासगी बसची ट्रकला धडक; ४ ठार, १२ जण गंभीर जखमी

वाशिम: वडप येथे खासगी बसची ट्रकला धडक; ४ ठार, १२ जण गंभीर जखमी

वाशिम: पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील मालेगाव – मेहकर रस्त्यावरील वडप येथे खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला पाटीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघात ४ ठार तर १२ जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी रात्री (दि.८) १० च्या सुमारास झाला. जखमींना १०८ रुग्णवाहिकेतून मालेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले आहे. तर प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना वाशिम जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींची नावे खालील प्रमाणे – सुशीला राठोड (वय 25, वडगाव जि. यवतमाळ), रवि राठोड (वय 32, वडगाव, जि. यवतमाळ), संदेश चव्हाण (वय 20, वडगाव, जि. यवतमाळ), देवीदास आडे (वय 40, पन्हाळा, जि. यवतमाळ), स्वाती राठोड (वय 7, वडगाव, जि. यवतमाळ), रविंद्र गुंजकर (वय 39, केनवड, जि. वाशिम), अमोल मनोहर (वय 29, यवतमाळ), संजय राठोड (वय 40, यवतमाळ), विठ्ठल राठोड (वय 45, यवतमाळ), विठ्ठल केनवडकर (वय 36), रामचरण राऊत (वय 64, महाराव, जि. यवतमाळ), भीमराव वाकुडे (वय 65, केनवड, जि. वाशिम)

जखमींना रूग्णवाहिका चालक राहुल सांगळे, डॉ. हेमंत जोरेवार यांनी उपचारा करीता मदत केली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news