जालना : एक दिवसाच्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकास गटारात फेकले; २ महिलांना अटक | पुढारी

जालना : एक दिवसाच्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकास गटारात फेकले; २ महिलांना अटक

परतूर (जालना); पुढारी वृत्तसेवा : मंठा तालुक्यातील मोसा येथे बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या एका महिलेने मुलगी झाली म्हणून एक दिवसांच्या नवजात स्त्री जातीच्या अर्भकास गटारात फेकून दिल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सामाजिक कार्यकर्ते सूरज मानकर यांनी परतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि ६ मे रोजी सकाळी साडे नऊ वाजता मोसा (ता. मंठा जि. जालना) येथे अर्जुन चव्हाण यांचे घरासमोरील एक फूट खोल असणाऱ्या गटाराच्या नालीत नवजात स्त्री जातीच्या अर्भक पडलेले आढळले. याची माहिती मिळताच परतूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. सदर स्त्री जातीच्या नवजात अर्भकास वाटुर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टवार यांनी ताबडतोब तपासाची सुत्रे फिरवली. यानंतर गोपनिय माहितीच्या आधारे त्यांना मोसा येथे बाहेरगावातून बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या महिलेने व तिच्या आईने नुकतेच जन्मलेल्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून दिल्याची माहिती मिळाली. त्या आधारे सदरील दोन महिला विरुध्द परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघींना अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा :

Back to top button