हिंगोली: राजदरी येथील सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर | पुढारी

हिंगोली: राजदरी येथील सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात सरपंच माधव भिकाजी कराळे यांच्याविरोधात ५ सदस्यांनी आज (दि. २४) अविश्वास ठराव दाखल केला होता. ७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत ५ विरुद्ध २ असा ठराव मंजूर करण्यात आला. तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिले.

संबंधित अविश्वास ठरावाच्या बाजूने हातवर करून बळीराम कराळे, पांडुरंग कराळे, कल्पना कराळे, विजयमाला कराळे, रेणुका रिठे या ५ सदस्यांनी मतदान केले. त्यामुळे ५ विरुद्ध २ अशा फरकाने अविश्वास ठराव मंजूर झाला.

यावेळी ग्रामसेवक बाबुराव डुकरे, लिपिक शैलेश वाईकर आदीसह कर्मचारी उपस्थित होते. आता पुढील सरपंच कोण होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

Back to top button