नांदेड : जि.प.परिसरात भंगार वाहनांना आग; मोठी दुर्घटना टळली | पुढारी

नांदेड : जि.प.परिसरात भंगार वाहनांना आग; मोठी दुर्घटना टळली

नांदेड, पुढारी वृत्तसेवा जि.प.परिसरात विविध विभागांची भंगार वाहने अनेक वर्षापासून पडून आहेत. काल (रविवार) सायंकाळी 5.00 वाजण्याच्या सुमारास या भंगार वाहनांना आग लागली. आरोग्य विभागाच्या स्टोअरच्या बाजूला उभी असलेली भंगार वाहनांनी अचानक पेट घेतल्याचे लक्षात आल्यावर लगेच अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आले. अग्‍निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये पाच भंगार वाहनांचे अंदाजे 15 ते 20 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहीती असून, आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

भंगार वाहनांच्या बाजूस अनेक अधिकारी, कर्मचा-यांची निवासस्थाने आहेत. आग आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आग लागली की लावण्यात आली, याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. या आग प्रकणाची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर – घुगे यांनी तातडीने दिले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button