नांदेड: खानापूर फाट्याजवळ कार-दुचाकीच्या धडकेत १ ठार; २ जखमी | पुढारी

नांदेड: खानापूर फाट्याजवळ कार-दुचाकीच्या धडकेत १ ठार; २ जखमी

देगलूर; पुढारी वृत्तसेवा: कार व दुचाकीची समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर कार मधील दोघेजण जखमी झाले. हा अपघात शनिवारी (दि.१५) रात्री १० च्या सुमारास देगलूर – नांदेड मार्गावरील खानापूर फाट्याजवळील दुर्गा धब्याजवळ घडला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देगलूरहून नांदेडकडे भरधाव निघालेल्या कारची (एमएच 14 जी एन 1103) आणि दुचाकीची (एच आर 05 ए बी 9666) खानापूर फाट्याजवळील दुर्गा धाब्यासमोर जोराची धडक झाली.

या अपघातात हरयाणा येथील कुलींदरसींग मख्खनसिंग (वय 50) हे जागीच ठार झाले. तर कारचालक शेख आदिल शेख असाफ (वय 22, रा. बंडागल्ली, देगलूर) व शेख मुबीन अलीसाब (वय 22 ) हे जखमी झाले. देगलूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा 

Back to top button