

जवळा बाजार; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन १८ संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १८४ नामनिर्देशक अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननीत ६ अर्ज अवैध ठरले. आतापर्यंत शिल्लक १७८ अर्जांपैकी १ अर्ज मागे घेण्यात आला. २० एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेण्याची मूदत आहे. त्याच विदशी निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार हे स्पष्ट होणार आहे.
जवळा बाजार येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ३ एप्रिलपर्यंत सुमारे १८४ नामनिर्देशक अर्ज दाखल झाले होते. ५ एप्रिलला नामनिर्देशन अर्जांची छाननी झाली. यामध्ये १८४ नामनिर्देशन पैकी ६ नामनिर्देशन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियामध्ये एकूण नामनिर्देशन १७८ अर्ज शिल्लक राहिले. ६ एप्रिल ते २० एप्रिल पर्यंत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
आज ( दि.१३) व्यापारी मतदार संघातून राजु गंगाराम पवार यानी नामनिर्देशन अर्ज मागे घेतला. १७७ अर्ज शिल्लक राहिले आहेत. २१ एप्रिलला निवडणूक निशाणी वाटप करण्यात येणार असून २८ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया होणार आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत २० एप्रिलपर्यंत आहेत. त्याच विदशी निवडणूक रिंगणात किती उमेदवार राहणार हे स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :