हिंगोली : भरदिवसा महिलेचे ५० हजार रुपये पळविले

हिंगोली : भरदिवसा महिलेचे ५० हजार रुपये पळविले
Published on
Updated on

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील पोस्ट ऑफिस रोड भागामध्ये एका महिलेच्या बॅगला ब्लेड मारून चोरट्यांनी 50 हजार रुपये पळविले. ही घटनेनंतर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शहरातील तिरुपती नगर भागातील रहिवासी प्रमिला मावळे या बुधवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास भारतीय स्टेट बँकेत पैसे काढण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी बँकेतून 50 हजार रुपयाची रक्कम काढली. सदर रक्कम व बँकेचे पासबूक त्यांनी बॅगमध्ये ठेवले त्यानंतर त्या पोस्ट ऑफिस रोड भागातील एका कटलरी दुकानांमध्ये साहित्य खरेदीसाठी गेल्या. त्या ठिकाणी साहित्य बघत असताना त्यांची बॅग खालच्या बाजूने फाटलेली दिसून आली. त्यामुळे त्यांनी बॅगची पाहणी केली असता बॅग खाली

ब्लेड मारून चोरट्यांनी पन्नास हजार रुपयाची रक्कम व बँकेचे पासबूक पळविल्याचे दिसून आले.
या प्रकारानंतर प्रमिला मावळे यांनी हिंगोली शहर पोलीस ठाणे तक्रार दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटिव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा शोध सुरू आहे.तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news