50 खोके रॅप गीत; राम मुंगासे अटकेत | पुढारी

50 खोके रॅप गीत; राम मुंगासे अटकेत

छत्रपती संभाजीनगर : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेत बंड केले. या या सत्तांतरानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदारांना 50 खोके घेतल्याचा आरोप करण्यात आला. महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर आधारित एक रॅप गीत राज मुंगासे या रॅपरने तयार केले.

या रॅप गीतामध्ये 50 खोके आणि चोर अशा शब्दांचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान सोशल मीडियावर हे गाणे व्हायरल झाल्यानंतर अंबरनाथ मधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आता या तरुणाला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी याबद्दल ट्वीट केले आहे.

Back to top button