बीडमध्ये बनावट प्रॉपर्टी कार्ड बनवून पालिकेच्या भूखंडाची विक्री

बीडमध्ये बनावट प्रॉपर्टी कार्ड बनवून पालिकेच्या भूखंडाची विक्री

बीड, पुढारी वृत्तसेवा : बनावट प्रॉपर्टी कार्ड तयार करुन नगरपालिकेच्या मालकीचे भुखंड विक्री करण्याचा प्रकार बीडमध्ये उघडकीस आला. या प्रकरणात शासनाची ६० लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आरोपी असलेल्या अॅड. अशोक शेटे याला पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्याला ४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे..

बीड नगर पालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या प्लॉट क्र. ९३ व ९६ यांची २० लाख रूपयांमध्ये तसेच नगर परिषद बीड वार्ड क्र. १ गट ३ मालमत्ता क्र. १-३-२१५० हा १८ लाख ४० हजार रूपयांत आपसात खरेदी विक्री केली. यासाठी आरोपींनी भुमि अभिलेख कार्यालयाचे बनावट प्रॉपर्टी कार्ड तयार करून शासनाची ६० लाख ८२ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार दि. ७ एप्रिल २०२२ ते दि. १ एप्रिल २०२३ या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालय नगर रोड, बीड येथे घडला. या प्रकरणात राजेंद्र उर्फ अंबरिश देविदास काटे यांच्या फिर्यादीवरून अशोक देवराव शेटे, मिनाबाई अशोक शेटे (दोघे रा. बीड), साधना बाळु शिंदे, बाळु सर्जेराव शिंदे (रा. पालवण ता. जि. बीड) आणि बाळासाहेब आबासाहेब ढोले (रा. शहेंशाह नगर, बीड) यांच्याविरूध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news