बीड : शिवपार्वती कारखान्यावर येथे ईडी, सीबीआयची धाड

धारूर, पुढारी वृत्तसेवा : शंभर कोटीचा घोटाळ्या प्रकरणी धारूर तालुक्यातील शिवपार्वती साखर कारखान्यावर ईडी व सीबीआयच्या पथकाने थाड टाकली असून येथील कागदपत्रे ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस पथकाने कारखान्यावर हजेरी लावून कागदपत्रे हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या प्रकरणामध्ये शंभर रुपयाच्या बॉण्डवर पार्टनर होवून सोळंके यांची फसवणूक झाल्या प्रकरणी कारखान्याचे चेअरमन पांडुरंग सोळंके यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.
धारूर तालुक्यात येथील शिवारामध्ये येथीलच पांडुरंग तिडके यांनी सन २००० मध्ये साखर कारखान्याला मंजुरी घेतली होती. मंजुरीनंतर दोन वर्षातच सन २००२ मध्ये मध्ये ३५ एकर जमीन खरेदी करून शिवपार्वती साखर कारखाना उभारणीस हालचाली सुरु केल्या होत्या .कारखान्याचे काम आर्थिक अडचणीमुळे प्रथम सुरू झाले नाही .सन २०१० मध्ये पुन्हा कारखान्याचे लायसनला मान्यता घेण्यात आली होती. तेव्हापासून कारखान्याचे चेअरमन हे पांडुरंग सोळंके होते. दरम्यान आर्थिक अडचणीत आलेले सोळंके यांनी मुंबई येथील नंदकुमार तासगावकर नामक व्यक्तीबरोबर शंभर रुपयांच्या बॉण्डवर कारखान्यात पार्टनरशिपचा करारनामा केला होता.
हेही वाचंलत का?
- Radhika Apte: राधिका आपटेच्या ‘मिसेस अंडरकव्हर’ फिल्मचा ट्रेलर रिलीज, ‘या’ OTT वर करणार धमाल
- चिमुकलीच्या धाडसाने दरोड्याचा प्रयत्न फसला; जळगावच्या मुक्ताईनगरातील घटना