बीड, पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. आम्ही गांधीवादी नाहीत. आमच्याशी कोणी ज्या भाषेत बोलेल त्याचं भाषेत त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा निलेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राची दिशा होऊ शकत नाही, अशी टीकाही राणे यांनी केली. ते केज न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर बोलत होते.