निलेश राणे यांची संजय राऊतांवर सडकून टीका; म्हणाले... | पुढारी

निलेश राणे यांची संजय राऊतांवर सडकून टीका; म्हणाले...

बीड, पुढारी वृत्तसेवा : संजय राऊत यांच्या जिभेला हाड नाही. आम्ही गांधीवादी नाहीत. आमच्याशी कोणी ज्या भाषेत बोलेल त्याचं भाषेत त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा निलेश राणे यांनी ठाकरे गटाला दिला. संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राची दिशा होऊ शकत नाही, अशी टीकाही राणे यांनी केली. ते केज न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर बोलत होते.
निलेश राणे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली होती. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे केज तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला निलेश राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. यांच्या न्यायालयात नियमित जमिनीसाठी निलेश राणे केज येथे आले होते.

हेही वाचंलत का?

Back to top button