हिंगोली जिल्ह्यात गारपीटीमुळे पीकांचे मोठे नुकसान

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. शनिवारी जिल्हयात अवकाळी पावसाने चांगलाच कहर केला. गारपीट, विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला असून वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बीज्वारी, गव्हाचे पिक आडवे पडले असून या सोबतच आंबा, संत्रा, मोसंबी, केळी या फळपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
जिल्हयात खरीप हंगामात सोयाबीन व इतर पिकांच्या काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे हाती आलेला घास हिरावला गेला आहे. मात्र पावसामुळे हरभऱ्याचे नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्यासह गारपटीमुळे गव्हाचे पिक आडवे झाले आहे. त्यामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची रब्बी हंगामात कसर निघेल या आशेवर पाणी फेरले गेले आहे. दरम्यान, मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी व्हाईस मेसेजद्वारे दिले होते.
हिंगोली जिल्हयात मागील दोन दिवसांत झालेल्या गारपीटीमुळे नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांसह तलाठी, मंडळ अधिकारी रविवारी ता. 19 बांधावर पोहोचले असून त्यांच्याकडून पिकनुकसानीची माहिती घेतली जात आहे. जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार 13 हजार शेतकऱ्यांचे 5603 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
हेही वाचंलत का?
- Neha Pendse : अबब! नेहा पेंडसे चक्क सहा मुलांची आई ? पहा काय आहे प्रकरण…
- साता जन्माचे नातं सात तासात तोडले! नववधूने लग्न मोडण्याचे कारण ऐकून तुम्ही हैराण व्हाल