परभणी: उखळीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत | पुढारी

परभणी: उखळीतील मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उखळी (बुद्रुक) येथील वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या बाळासाहेब बाबुराव फड व परसराम गंगाराम नागरगोजे या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत देण्यात आली. आज (दि.१८) सायंकाळी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या शासकीय मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी तालुक्यातील उखळी (बुद्रुक) येथे शेतात ज्वारी पीक काढण्याचे काम करत असताना अंगावर वीज पडल्याने बाळासाहेब बाबुराव फड व परसराम गंगाराम नागरगोजे या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची शासकीय यंत्रणेने तातडीने दखल घेत एनडीआरएफ माध्यमातून संबंधित दोन्ही मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाखांची मदत केली.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार राजेंद्र कोळेकर, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, जि.प. चे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी निरदुडे, रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे तालुका प्रभारी हनुमंत मुंढे आदी उपस्थित होते.

हेही वाचा  

Back to top button