परभणी: गंगाखेड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल | पुढारी

परभणी: गंगाखेड तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले; शेतकरी हवालदिल

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : गंगाखेड शहरासह तालुक्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने आज (दि.१८) दुपारी ५ च्या सुमारास झोडपून काढले. उभ्या पिकांमध्ये गारांचा पाऊस पडल्याने हरभरा, गहू, ज्वारी, मका, पिके भुईसपाट झाली.

गंगाखेड शहरासह तालुक्याच्या विविध भागात दुपारी गारपिटीसह अवकाळी पाऊस झाल्याने सर्वत्र दाणादाण उडाली. तालुक्यातील सुप्पा (जहांगीर) येथील शेतकरी राजू घोगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ४:४० ते ५ वाजण्याच्या सुमारास गारपीटीसह झालेल्या अवकाळी पावसाने परिसरातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत. गारपिटीमुळे सुप्पा व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गंगाखेड तालुक्यातील गोदाकाठ, डोंगरी भागासह बहुतांशी भागात आणि शहरात अवकाळी पाऊस व गारपिटी झाली. गारांचा खच सर्वत्र पाहावयास मिळत आहे.

हेही वाचा 

Back to top button