छत्रपती संभाजीनगर : गोळेगाव येथे टेम्पोच्या धडकेत १ ठार, २ जण जखमी | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : गोळेगाव येथे टेम्पोच्या धडकेत १ ठार, २ जण जखमी

अजिंठा; पुढारी वृत्तसेवा : भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना छत्रपती संभाजीनगर- जळगाव महामार्गावरील गोळेगावजवळील धोत्रा फाटा येथे घडली. दिलीप जाधव (वय ४१, रा. शेखपूर, ता. जि. बुलढाणा) असे मृताचे नाव आहे. तर रोहन दिलीप जाधव (वय १५), गोपाळ दिलीप जाधव (वय १०) हे दोघे गंभीर जखमी झाले.

याबाबत मिळालेल्या माहिती अशी की, धोत्राहुन उडणगावकडे येत असताना भरघाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तिघेही दुचाकीवरून दूरपर्यत फेकले गेले. यातील एक जण जागी ठार झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद भिंगारे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सिल्लोड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा 

Back to top button