जालना : जिल्ह्यातील ३५६ शाळांत होणार संपादणूक सर्वेक्षण चाचणी | पुढारी

जालना : जिल्ह्यातील ३५६ शाळांत होणार संपादणूक सर्वेक्षण चाचणी

जालना, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीने दर तीन वर्षातून एकदा राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी म्हणजेच ‘नॅस’ परीक्षेचे आयोजन केले जाते. याच धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राज्यभरातील शाळांमध्ये राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण चाचणी म्हणजेच स्लॅस परीक्षा जिल्ह्यातील ३५६ शाळांमध्ये १७ मार्च होणार आहे.

राज्यस्तरीय अध्ययन संपादणूक सर्वेक्षण चाचणी ही इयत्ता तिसरी, पाचवी व आठवीतील मुलांची घेतली जाते. यासाठी जिल्हयातील ३५६ शाळांची निवड राज्यस्तरावरूनच या दृच्छिकपणे करण्यात आलेली आहे. तसेच जिल्हास्तरावर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जालना याठिकाणी या परीक्षेचे प्रमुख म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता संजय येवते व अधिव्याख्याता डॉ. श्रीहरी दराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तालुकास्तरा-वरदेखील डायट जालना येथील अधिव्याख्याता यांची समन्वयक व तालुकास्तरावर क्षेत्रीय अन्वेषक, यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषद उप शिक्षणाधिकारी माध्यमिक विपुल भागवत, प्राथमिक विनया वडजे, सर्व गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, साधन व्यक्ती, काम पाहणार आहेत. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे ज्येष्ठ अधिव्याख्याता जालिंदर बटुळे, अधिव्याख्याता विनोद राख, प्रेरणा मोरे, योगेश्वर जाधव समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.

Back to top button