अपघाताचे फोटो काढणे बेतले जिवावर | पुढारी

अपघाताचे फोटो काढणे बेतले जिवावर

छत्रपती संभाजीनगर : नात्यातील एका व्यक्तीला कारने धडक दिल्याने ५३ वर्षीय शेतकरी घटनास्थळी पोहोचत अपघाताचे फोटो काढत असताना अचाकन भरधाव आलेल्या कारने या शेतकऱ्याला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी हर्सल रोडवरील मधुरा लॉन्ससमोर घडली. या प्रकरणी हर्सल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कारने एका दुचाकीस्वारास धडक दिली. धडकेत भावाचा साला झाल्याचे कळताच जाधववाडीतील शेतकरी बाबासाहेब अंबादास काळुसे (५३) हे दुभाजक ओलांडून अपघातस्थळी गेले. त्या ठिकाणी ते अपघाताचे फोटो काढत असताना सावंगी येथून भरधाव आलेल्या कारने (एमएच ०३, बीजे ७५१५) त्यांना जोराची धडक दिली. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले.

Back to top button