छत्रपती संभाजीनगर : सात वर्षांपूर्वी जिथे आईने प्राण सोडला, तिथेच मुलाचाही मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : सात वर्षांपूर्वी जिथे आईने प्राण सोडला, तिथेच मुलाचाही मृत्यू
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सात वर्षांपूर्वी जिथे आईचा अपघाती मृत्यू झाला, त्या ठिकाणीच शुक्रवारी (दि. ३) पहाटे २ वाजता मुलाला मृत्यूने गाठल्याची हृदयद्रावक घटना घडली. जालना रोडवर एसएफएस शाळेसमोर भरधाव कार आधी दुभाजकाला आणि नंतर स्कायवॉकच्या लोखंडी खांबाला धडकून झालेल्या या भीषण अपघातात १७ वर्षीय युवक जागीच ठार झाला. अपघातानंतर सोहमवरच गुन्हादेखील दाखल झाला, अशी माहिती पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.

सोहम नीरज नवले (रा. एस्सार पेट्रोल पंप जवळ, गजानन मंदिर) असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहम हा शहरातील वंडर गार्डन शाळेत दहावीत शिक्षण घेत होता. गुरुवारी त्याने पहिला पेपरही दिला होता. त्याला कार चालविता येत नव्हती, परंतु त्याला कार शिकायची होती. गुरुवारी रात्री तो वडील व बहीण साईसोबत कॅनॉट परिसरात आइस्क्रीम खाण्यासाठी गेला. ते रात्री अकरा वाजता घरी परत आले. त्यानंतर सर्व जण झोपी गेले. मात्र, मध्यरात्रीनंतर सोहम गुपचूप कार (एमएच २० वाय ६८१९) घेऊन बाहेर पडला. काही वेळाने वडील बाहेर आले असता दरवाजा उघडा दिसला. त्यांनी मुलीकडे चौकशी केली. तिला काही माहिती नसल्याने दोघे सोहमच्या शोधात दुचाकीवर निघाले. मात्र इकडे सोहम भरधाव कार चालवीत असताना पावणेदोन वाजेच्या सुमारास एसएफएस शाळेसमोरील दुभाजकाला धडकला आणि ठार झाला. २०१६ मध्ये आईचा अपघाती मृत्यू अपघाताची माहिती मिळाल्यावर सोहमचे नातेवाईक घटनास्थळी आणि पोलिस ठाण्यात आले. त्यांच्या चर्चेनुसार, सोहमच्या आईचा २०१६ मध्ये असाच रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. याच ठिकाणी रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीने उडविले होते. तेव्हा सोहमच्या मामाचा मुलगाही त्यांच्यासोबत होता.

ताशी १२० कि.मी.चा वेग

घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे, उपनिरीक्षक मीरा चव्हाण यांनी धाव घेतली. अपघात झाला तेव्हा कारची गती ताशी १२० कि.मी. पेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. कार आधी दुभाजकावर धडकली. त्यानंतर कारचे डायरेक्शन बदलले आणि कार आडवी होऊन हायमास्टच्या खांबाला आदळली. त्यानंतर कारचा चुराडा झाला. अधिक तपास उपनिरीक्षक रावसाहेब काकड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news