ऑनलाइनवर अजूनही ‘औरंगाबादच

ऑनलाइनवर अजूनही ‘औरंगाबादच
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर;सुनील कच्छवे :  शासनाने आठवडाभरापूर्वी औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे केले. लगोलग महापालिकेने तसा बदल केला, एसटी महामंडळाने बसस्थानकावरील फलक बदलले, बसेस- वरील पाट्या बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. इतर शासकीय कार्यालयांकडूनही अभिलेख्यांमध्ये शहराचे नवीन नाव वापरण्यास सुरुवात झाली आहे, परंतु ऑनलाइन मात्र अजूनही हा बदल झालेला नाही. अगदी महापालिकेसह पोलिस आयुक्त आणि शासनाच्या वेबसाइटवर तसेच ट्विटर हॅण्डलवर आजही औरंगाबाद हाच उल्लेख कायम आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे अशी जुनी मागणी होती. १९८८ साली महापालिका निवडणुकीनंतर मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरील विजयी सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वप्रथम शहराचे संभाजीनगर असे नामकरण केले होते. तेव्हापासून शिवसेनेचे पदाधिकारी शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करत आले आहेत. भाजप- नेही संभाजीनगर हेच नाव रूढ केले. नऊ महिन्यांपूर्वी राज्य सरकारने शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्याचा ठराव घेऊन केंद्र शासनाकडे पाठविला होता. आता केंद्र शासनाने २४ फेब्रुवारी रोजी त्यास मंजुरी दिली. त्यानंतर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने तशी अधिसूचना जारी केली. लगोलग महापालिकेने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असा बदल करून घेतला.

इतर सरकारी कार्यालयांच्या अभिलेख्यांमध्ये तसेच नामफलकांमध्येही तशाच पद्धतीचे बदल करून घेतले जात आहेत. असे असले तरी ऑनलाईनवर मात्र शहराचे नाव औरंगाबाद असेच आहे. सर्व शासकीय कार्यालयांच्या वेबसाइटवर अद्यापही औरंगाबाद असा उल्लेख आढळून येत आहे. तिथे मात्र हा बदल झालेला नाही.

या कार्यालयांच्या वेबसाइट

महापालिकेची वेबसाइट ही औरंगाबाद महापालिका या नावाने आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी आणि पोलिस आयुक्त कार्यालयाच्या वेबसाइटच्या नावातही औरंगाबाद हा शब्द आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, जिल्हाधिकारी कार्यालय, जीएसटी कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आदींच्या वेबसाइटवर औरंगाबाद असाच उल्लेख आहे. राज्य सरकारी कार्यालयांप्रमाणेच केंद्र सरकारच्या कार्यालयांच्या वेबसाइटवरही शहराचे जुनेच नाव वापरात आहे. यामध्ये प्रामुख्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालय, पोस्ट खाते, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.

ट्विटर हॅण्डलच्या नावात बदल नाही

महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त, जिल्हाधिकारी, स्मार्ट सिटी सीईओ यांची ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खाती आहेत. ते यावर अधूनमधून काही पोस्ट करत असतात. मात्र, त्यांच्या ट्विटर हॅण्डलवर शहराचे नाव बदललेले नाही. या सर्वांच्या नावांत प्रकर्षाने औरंगाबाद हे नाव आहे.

नाव बदलण्यात एसटी महामंडळ अग्रेसर

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: एसटी महामंडळाने औरंगाबाद नाव बदलून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे नाव तात्काळ करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावर अमलबजाणी करत सर्व बसस्थानकांसह बसचे नामफलकही रातोरात बदलण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान रेल्वे आणि विमानतळ प्रशासन मात्र अद्यापही वरीष्ठांच्या आदेशांची प्रतीक्षा करत असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. १ मार्च रोजी सकाळीच मुख्य बसस्थानकाचे नाव मध्यवर्ती बसस्थानक छत्रपती संभाजीनगर असे बदलण्यात आले, तर सिडकोचे छत्रपती संभाजीनगर विभाग सिडको बसस्थानक असे नाव बदलण्यात आले. याच बरोबर बसवर लावण्यात येणारे नामफलकही बदलण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या पाठोपाठ ई. टी मशीनमध्येही (तिकीट मशील) लवकरच बदल करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news