हिंगोली : सेनगाव येथील कादंबरी देशमुखच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड | पुढारी

हिंगोली : सेनगाव येथील कादंबरी देशमुखच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : सेनगाव येथील मातोश्री स्व. लक्ष्मीबाई येवले प्राथमिक विद्यालयाची विद्यार्थीनी कादंबरी कैलासराव देशमुख हिच्या प्रयोगाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यालयाच्या प्रयोगाची सलग आठव्यांदा या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

इन्स्पायर अवॉर्ड २०२२-२३ साठी जिल्ह्यतून ऑनलाइन नामांकने भरण्यात आली होती. यामध्ये जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये कादंबरी देशमुख हिचा समावेश आहे. तिला विद्यालयाचे सहशिक्षक विलास कोकाटे व किशोरकुमार धवसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिने शेतकरी बहुपयोगी काडी हा प्रयोग सादर केला. या प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांना शेती साहित्यासह आपल्या दैनंदिन व्यवहारातही या छडीचा उपयोग होणार असल्याचे तिचे मत आहे. तिच्या या बहुउपयोगी असलेल्या छडीची निवड झाली आहे.

तिच्या या यशाबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव येवले, सचिव सरस्वती येवले, सह विद्यालयाचे मुख्याध्यापक विजय येवले, सह एस.टी. मुटकुळे, जे. टी. गीते, आर. बी. वाघमारे, पी. एस. शिंदे, जे. बी. हगवणे, आर. डी. कोकाटे, पी. एन. मुटकुळे, पी. एन. कोळपे, एल. वाय. घ्यार, बी. पी. बुळे, यु. व्ही. घुगे, सिमा तांबिले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button