राष्ट्रवादीला औरंगजेबाचा पुळका का? : विक्रांत पाटील | पुढारी

राष्ट्रवादीला औरंगजेबाचा पुळका का? : विक्रांत पाटील

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेस सातत्याने औरंजेबाच्या नावाचा जप करत आहे. त्यांना औरंगजेबाचा एवढा पुळका का आहे? असा सवाल भाजपचे औरंगाबाद सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला. औरंगजेब तुमचे आदर्श असतील तर तसे स्पष्ट जाहीर करावे आणि त्याचा फोटो आपल्या झेंड्यावर आणि लोगोवर लावावा, असे आव्हानही दिले.

औरंगजेब महालाच्या जीर्णोद्धाराची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी चांगलीच वादात अडकली आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या भूमिकेचा निषेध केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्मचिंतन करावे, असे आवाहन करून विनोद पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास पुढे आणला पाहिजे. औरंगजेबाचा इतिहास पुढे आणून काय मिळणार आहे? जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी निषेध केला.

Back to top button