औरंगाबाद : आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर दगडफेक; मिरवणूक रोखल्याने राडा

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तालुक्यातील महालगाव येथील सभा उधळली गेल्याने त्यांना तेथून काढता पाय घेण्याची नामुष्की ओढवली गेली. एवढेच नव्हे, तर ते सभेसाठी आले असताना त्यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सभास्थळी एकच गोंधळ उडाला.
ही घटनातालुक्यातील महालगाव येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला असून, खबरदारी म्हणून गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शिवसंवाद यात्रेनिमित्त ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील महालगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सभा आयोजित करण्यात आली होती. तत्पूर्वी, गावातील तरुणांनी रमाई जयंतीनिमित्त मिरवणूक काढली होती. त्यावेळी हा प्रकार घडला.