E-POS machine : नव्या ई-पॉस मशिनने धान्य वाटप गतिमान होणार

E-POS machine : नव्या ई-पॉस मशिनने धान्य वाटप गतिमान होणार
Published on
Updated on

बीड; उदय नागरगोजे : रेशनच्या धान्य वाटपासाठी ई-पॉस मशिनचा वापर सुरू होऊन आता सहा वर्षे उलटली. त्यावेळी या मशिनला टू जीचे कार्ड वापरता येत होते. आता एकीकडे फाईव्ह जीचे तंत्रज्ञान आलेले असतानाही टू जीची सुविधा असलेल्या ई-पॉस मशिन वापरताना अडचणी येत आहेत. यावर आता उपाय म्हणून येत्या दोन महिन्यांत फोर जीची स्पीड ई-पॉस नवीन मशिनला मिळणार आहे. याबरोबरच डेबिट कार्डचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.

धान्यवाटपात पारदर्शकता यावी म्हणून साधारण सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये ई-पॉस मशिन आणल्या गेल्या. तेव्हापासून लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वाटप करण्यात येऊ लागले. बदलत्या तंत्रज्ञानानुसार या मशिनही अपग्रेड होणे अपेक्षित असल्याने त्या दिशेने तयारी पूर्ण झाली आहे. आता अवघ्या दोन महिन्यांत म्हणजे साधारण मार्च-एप्रिलमध्ये फोर जी तंत्रज्ञान असलेल्या या मशिन रेशन धान्य दुकानदारांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

धान्याचे वजनही होणार कनेक्ट?

ई-पॉस मशिनवर लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा घेतल्यानंतर त्याला ज्या योजनेतून धान्य मंजूर आहे, त्यानुसार ते वितरित केल्याचे गृहीत धरले जाते. नव्याने येणार्‍या या मशिनला वजनाचे मशिनही कनेक्ट करण्याचा विचार सुरू आहे. तथापि, तसा अद्ययावत वजन काटा उपलब्ध करण्याबाबतचा अडसर कायम आहे. असे झाल्यास त्या लाभार्थ्याला किती धान्य वितरित करण्यात आले, याची माहिती ऑनलाईन नोंदवली जाऊन धान्य कमी दिल्याच्या तक्रारी कमी होऊ शकतील.

अंगठा नाही उमटला तरी नो टेन्शन!

येत्या दोन महिन्यांत उपलब्ध होणार्‍या मशिनसोबत आयरिस स्कॅनरही दिले जाणार आहे. ज्या वयोवृद्ध लाभार्थ्यांच्या अंगठ्याचे ठसे ई-पॉस मशिनवर उमटत नाहीत त्यांच्यासाठी आयरिस स्कॅनर वापरता येणार आहे. आधार कार्डवर जसा रेटीना स्कॅन होतो, अगदी तसेच स्कॅनिंग यामध्ये होणार असल्याने आता अंगठ्याचा ठसा उमटला नाही तरी अडचण येणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news