वाशिम : चोरट्यानी ३५ पोते तूरीने भरलेली मालवाहू गाडी पळवून नेली | पुढारी

वाशिम : चोरट्यानी ३५ पोते तूरीने भरलेली मालवाहू गाडी पळवून नेली

वाशीम ; पुढारी वृत्तसेवा मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा गावातील मुख्य शिवाजी चौकात तूरीची ३५ पोते भरलेलेली मालवाहू मॅक्स पीकअप गाडी तुरीच्या पोत्यासहीत चोरट्याने रात्री लंपास केली. मिळालेल्‍या माहिती नुसार तुरीचे ३५ पोते भरलेली मालवाहू गाडी गणेश कापसे यांच्या घरासमोर लावली होती. ही गाडी आसिफ बुड्डनखॉ पठाण यांच्या मालकीची आहे.

रात्री २ ते ३ वाजण्याच्या दरम्यान मालवाहतूक गाडी ३५ पोते तुरीसह चोरट्याने पळवून नेली. यामुळे किन्हीराजा गावात खळबळ उडाली आहे, तर सदर घटनेचा तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button