लातूर: देवणी येथे दोन भावांचा विहिरीत बुडून मृत्यू | पुढारी

लातूर: देवणी येथे दोन भावांचा विहिरीत बुडून मृत्यू

देवणी; पुढारी वृत्तसेवा : देवणी येथील दोन चुलतभाऊ विहिरीत पाय घसरून पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.३) सकाळी घडली. नरसिंग युवराज चव्हाण (वय २०) व त्याचा चुलत भाऊ संगमेश्वर संजय चव्हाण (वय १८, रा. दोघे देवणी) अशी मृतांची नावे आहेत. त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी नरसिंग आणि संगमेश्वर जवळच्या शेतावर गेले होते. दरम्यान, पाणी आणण्यासाठी ते विहिरीत उतरले. एकमेकांचा हात धरून ते पाणी घेत होते. यावेळी पायाखालील दगड घसरल्याने त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडून मृत्यू पावले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता त्या दोघांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.

याप्रकरणी अंकुश युवराज चव्हाण यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उस्तुर्गे करत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button