बीड : केज तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार; अनेकांची जनावरे गेली वाहून | पुढारी

बीड : केज तालुक्यात अतिवृष्टीने हाहाकार; अनेकांची जनावरे गेली वाहून

केज (बीड); गौतम बचुटे : काल रात्री झालेल्या अतिवृष्टीने केज तालुका पूर्णतः जलमय झालेला आहे. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर एके ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असताना तयार केलेला तात्पुरता पूल वाहून गेला आहे.

काही ठिकाणी पूल खचले आहेत. अनेक गावांत पुरांचे पाणी शिरल्याने लोकांना रात्रभर रस्त्यावर थांबावे लागले तर एका शेतकऱ्यांचा बंधाऱ्यात पडून मृत्यू झाला आहे. तसेच शेळ्या व जनावरे वाहून गेली असून वाहने देखील पाण्याच्या प्रवाहा सोबत वाहूत गेली आहेत.

दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी केज तालुक्यात रात्रभर अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिके पूर्णतः पाण्याखाली गेली. तसेच केज ते अंबाजोगाई दरम्यान डॉ थोरात यांच्या हॉस्पिटल जवळ वळण रस्त्यावर तयार केलेला तापूरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्याने रात्रभर वाहतूक थांबलेली आहे. तसेच युसुफवडगाव येथील पुलावरून पाणी वाहात असल्याने आणि पैठण ते सावळेश्वर दरम्यानच्या नदीवरच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने कळंब ते अंबाजोगाई दरम्यानची वाहतूकही बंद आहे.

तसेच आरणगाव ता केज येथील बालाजी ज्ञानोबा शिरसाठ वय २५ वर्ष या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. केजचा पूल वाहून गेला. केज ते अंबाजोगाई रोडचे काम सुरू असून तेथे पुलाचे बांधकाम सुरू असताना रहदरीसाठी तयार केलेला तात्पुरता पुलाला भगदाड पडल्याने पूल वाहून गेला. त्यामुळे दिवसभर या रस्त्याने होणारी वाहतूक पूर्णतः बंद आहे.

पैठण ते सावळेश्वर दरम्यानचा पूल खचला : उंदरी कडून येणाऱ्या नदीवर पैठण येथील पुलावरून पाणी वाहिले व त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाने पुलाचे कठडे वाहून गेले व पूल खचल्याने रात्रभर वाहतूक बंद होती.

पैठण गावात पाणी शिरले दोन बैल वाहून गेले : पैठण येथे गावात पाणी शिरल्याने शरद अच्युतराव चौधरी व अरुण अच्युतराव चौधरी यांचे गोठ्यात बांधलेले बैल वाहून गेले तर विनोद चौधरी यांचे हॉटेल, दैवशाला सरवदे यांचे संपुर्ण ठीबक व फार्म हाऊस शेड पुरात वाहुन गेले. तर बौध्द वस्तीतील सरवदे विश्वनाथ, कसबे भीमराव, सरवदे संघर्षा, अंकुशे रावजी पाराजी, अंकुश कांबळे, गुंडीबा कांबळे, लक्ष्मण सरवदे, दांड जोतीराम, जीलानी शेख या सर्वांच्या  घरात पाणी घुसल्यामुळे जीवनावशक वस्तुचे नुकसान झाले.

जवळबन शेळ्या व गाय वाद वासरू आणि मोटार सायकली वाहून गेल्या :- जवळबन येथील शिवाजी वैरागे यांच्या आठ शेळ्या, एक वासरू व गाय पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तसेच संतोष घरत, अंगद घरत, श्रीधर करपे व गणेश घरत या चौघांच्या मोटरसायकली देखील वाहून गेल्या आहेत.

लाडेगाव ते होळ व साळेगाव ते शेलगाव गांजी, बोबडेवाडी ते केज संपर्क तुटला :-  लाडेगाव लगतच्या ओढ्याला पूर आल्यामुळे लाडेगाव आणि होळचा संपर्क तुटला आहे तसेच केजडी नदीला आलेल्या पुरामुळे शेलगाव गांजी ते साळेगाव आणि बोबडेवाडी ते केज संपर्क तुटला आहे. तसेच आरणगाव व काळेगाव दरम्यान संपर्क तुटला आहे.

तसेच बोरगाव, कापरेवाडी, हादगाव, डोका, लाखा, बेलगाव, वरपगाव येथही धोकादायक परिस्थती निर्माण झालेली आहे.

अधिकारी सतर्क :- तहसीलदार डी सी मेंडके, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, लक्ष्मण धस केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे संदीप दहिफळे, विजय आटोळे यांनी रात्रभर जागून पूर परिस्थिवर लक्ष ठेवून होते.

तसेच पैठण (सावळेश्वर) येथील शरद अच्युतराव चौधरी, अरुण अच्युतराव चौधरी यांचे बैल, विनोद चौधरी यांचे हाॅटेल, दैवशाला सरवदे यांचे संपुर्ण ठीबक व फार्म हाऊस शेड पुरात वाहुन गेले. तर बौध्द वस्तीतील सरवदे विश्वनाथ, कसबे भीमराव, सरवदे संघर्षा, अंकुशे रावजी पाराजी, अंकुश कांबळे, गुंडीबा कांबळे, लक्ष्मण सरवदे, दांड जोतीराम, जीलानी शेख या सर्वांच्या  घरात पाणी घुसल्यामुळे जीवनावशक वस्तुचे नुकसान झाले.

ऊंदरी नदीवरील पुल कठडे तुटले तर सावळेश्वरच्या बाजूकडील पुल खचला असल्याने रहदारीस अडधळा निर्माण झाला आहे. युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहीफळे  व त्यांचे कर्मचारी तसेच तहसीलदार मेंडके यांच्या आदेशाने तलाठी साहेब हे प्रत्यक्ष रहदारीसाठी रस्ता मोकळा करत आहेत.

आरणगाव येथे बंधाऱ्यात एकजण वाहून गेला

तालुक्यातील आरणगाव येथे बालासाहेब तुकाराम शिरसाठ वय 25 वर्षे हा रेणुकाआई बंधार्‍या वरून त्याच्या शेतात जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात वाहून गेला असून त्याचा शोध चालू आहे. त्याच्या सोबत आनखी दोघे होते ते बचावले आहेत.

Back to top button