औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक : जिंतूर तालुक्यात ८८.९३ टक्के मतदान | पुढारी

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूक : जिंतूर तालुक्यात ८८.९३ टक्के मतदान

जिंतूर; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिंतूर तालुक्यात 88.93 टक्के मतदान झाले. एकूणच सर्व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. तालुक्यातील जिंतूर शहर, बोरी व बामणी या तीन केंद्रावर मतदान झाले. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेससह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बुथवर ठाण मांडून होते. त्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

मतदानाची टक्केवारी पुढील प्रमाणे

बोरी मतदान केंद्रावर एकूण 34 पैकी 5 महिलांनी तर 27 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजावला. बामनी येथे 3 महिला आणि 99 पुरुषांनी आपला हक्क बजावला. तर जिंतूर येथे एकूण 366 मतदाना पैकी 35 महिला तर 289 पुरूष अशा एकूण 324 जणांनी मतदान केले. बोरी मध्ये 94.11 टक्के, बामणीमध्ये 88.69 टक्के, तर जिंतूर शहरात 88.52 टक्के मतदान झाले. असे एकूण 88.93 टक्के मतदान झाले. सर्वात जास्त मतदानाची टक्केवारी बोरी येथे नोंदवली. औरंगाबाद विभागातील उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

हेही वाचलंत का ? 

नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत चुरस वाढली: दुपारपर्यंत ६१ टक्के मतदान

नाशिक पदवीधर निवडणूक : दिव्यांग पदवीधर मतदारास मतदानापासून रोखले

नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

Back to top button