उस्मानाबाद : शंभू महादेव कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप

बीड : पुढारी वृत्तसेवा – उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शंभू महादेव कारखाना वैद्यनाथ बँकेकडे गहाण होता. त्याच्या लिलाव प्रक्रियेत १०६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना ३१ जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्याबाबत नोटीस बजावली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यात आपेट यांचा शंभु महादेव कारखाना आहे. या कारखान्याला वैद्यनाथ बँकेने कर्ज दिले होते. कारखान्याकडून त्याची वेळेत परतफेड न झाल्याने बँकेने कारखाना लिलावात काढला. या लिलाव प्रक्रियेत तब्बल १०६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची तक्रार परळी येथील सुभाष निर्मळ यांनी दि. ५ जानेवारी रोजी केली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यावरुन आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना दि. ३१ जानेवारीपर्यंत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.
बँक पंकजा मुंडे यांच्या ताब्यात
वैद्यनाथ बँकेवर प्रारंभीपासून मुंडे कुटुंबाचे वर्चस्व राहिलेले आहे. सध्या कार्यरत असलेले संचालक मंडळही पंकजा मुंडे यांना मानणारेच आहे. त्यांच्या ताब्यात असलेल्या या बँकेला पोलिसांनी नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.
- Strike of Bank of Maharashtra : बँक ऑफ महाराष्ट्राचा आज संप; बैठक अयशस्वी झाल्यास पाच दिवस संप?
- जळगाव : विकासकामांची माहिती देण्यासाठी घेतली लाच, ग्रामसेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात
- अजिंठ्यात दाट धुक्याची चादर; पिकांवर रोगराई पडण्याची भीती, शेतकरी चिंतेत!