बीड : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड : कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेम्पोसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

केज (बीड),पुढारी वृत्‍तसेवा : कत्तल करण्यासाठी हैद्राबादकडे 12 बैल घेऊन जाणारा टेम्पो पोलिसांनी केज हद्दीत पकडला. हा टेम्पो केज मार्गे हैद्राबाद येथे जनावारांना घेऊन जात होता. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. ६) पोलिसांना सुत्रांकडून याबाबत माहिती मिळाली. या माहितीवरून नेकनूर येथून टेम्पो क्र. (एम एच-२५/ यु-०६६९) पोलिसांनी तपासणी केली. यामध्ये १२ बैल भरून ते केज मार्गे हैद्राबाद येथे जात होते.

हा टेम्पो केज ते अंबाजोगाई रोडवर ताब्यात घेतला. शेख जाफर शेख अहमद जव्हर (रा. नेकनुर) व अमोल दादा पावले (रा. घोरपडी) असे चालकांची नावे आहेत.

टेम्पो चालक व सोबतच्या इसमाची चौकशी केली असता 12 बैल नेकनूर येथील व्यापारी शौकत बाबामियाँ कुरेशी (रा. नेकनूर) यांनी भरून दिले असून त्यांचे सांगण्यावरून हैदराबाद येथे घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितले. १२ बैलासह एकूण ११ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तसेच युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news