हिंगोली : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

हिंगोली : सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
Published on
Updated on

जवळा बाजार: पुढारी वृत्तसेवा : माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बाराशिव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त परिसरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुनीता कातोरे होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून करंजाळा येथील सरपंच प्रांजली कदम, पोलीस पाटील मीराताई कदम, माजी महिला व बालकल्याण सभापती रत्नमाला चव्हाण, राष्ट्रवादी महिला प्रदेशच्या सचिव रत्नमाला शिंदे, अहिल्यादेवीच्या मुख्याध्यापिका सरिता पतंगे, जवळा बाजारच्या सरपंच स्वातीताई अंभोरे, तपोवन येथील महिला बचत गटाच्या विमल कदम, शिरडशहापूर येथील नूतन ग्रामपंचायत सदस्या नाजेमा सय्यद, ग्रंथपाल एल. डी. शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी पूरजळच्या सरपंच सुशीला हारके, गीता बियाणी, आशा जोशी, ज्योती पंडित, विमल चव्हाण, रंजना गायकवाड, सारिका चव्हाण, बेबी गायकवाड, विमल कदम, दिपाली कोटी, सुनिता मुळे, कल्पना वैद्य, बेबीताई जवळेकर, सुनिता अंभोरे निम्मा तेरसे, पुनम राखुंडे, वर्षा दावलबाजे, अश्विनी महाजन, डॉ. वैशाली आगलावे, सुनिता डूबे, कीर्ती पटवे या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी अल्का कुलकर्णी, विद्या दळवी, लता शिंदे, मनुजा महाजन यांनी परिश्रम घेतले. प्रा. चिंतामण जाधव यांनी सूत्रसंचालन तर प्रा. गजानन मुळे यांनी आभार मानले.

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news