बीड : शिवशाही बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू | पुढारी

बीड : शिवशाही बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

अंबाजोगाई : पुढारी वृत्‍तसेवा दवाखन्यात दाखल असलेल्या सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे जाण्यासाठी अंबाजोगाई बस स्थानकात आलेल्या वृद्धाला प्रवेशद्वारावर शिवशाही बसने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा औरंगाबाद येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

मनोहर वैजनाथ सुरवसे (वय ५२, रा. वानटाकळी ता. परळी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, मनोहर यांची सून डिलिव्हरीसाठी अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल आहे. शुक्रवारी (दि. ३०) मनोहर हे सुनेला जेवणाचा डबा देऊन गावाकडे परत जाण्यासाठी रात्रीच्या सुमारास अंबाजोगाई बस स्थानकाकडे आले. यावेळी रात्री ९.१५ वाजता बस स्थानकात प्रवेश करत असलेल्या बीड-हैद्राबाद या शिवशाही बसने (एमएच ०९ एफएल १०२१) मनोहर यांना धडक दिली.

या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मनोहर यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना शनिवारी (दि. ३१) त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किरण मनोहर सुरवसे यांच्या तक्रारीवरून शिवशाही बसच्या चालकावर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा : 

Back to top button