हिंगोली : महामार्गावरील उंच नाल्‍याचे बांधकाम ठरतेय जीवघेणे | पुढारी

हिंगोली : महामार्गावरील उंच नाल्‍याचे बांधकाम ठरतेय जीवघेणे

औंढा नागनाथ (हिंगोली), पुढारी वृत्‍तसेवा : रेस्ट हाऊस ते मार्केट कमिटी पर्यंत महामार्ग रस्त्याचे काम सुमारे दोन वर्षांपासून सुरू आहे. अनेकवेळा काम बंद झाले तर कधी बोगस कामावरून बांधकाम बंदही पाडण्यात आले. त्यावरही मार्ग काढत रस्ता प्रशासन व सदर कॉन्ट्रॅक्टर कंपनीने तोडगा काढत हे काम पूर्ण ताकदीने परत सुरू केले आहे. पण ते काम सुरू करण्याच्या घाईत अनेक अडचणी निर्माण तर केल्यात. शिवाय औंढा नागनाथ येथील जवळपास हजार ते 2000 रहिवाशी घरांना रोडवर येण्यासाठी बंदी घातल्याचे दिसून येत आहे. सदर रोडवर  राहणारे हजार ते 2000 रहिवाशांना साठी असलेले पादचारी मार्ग जवळपास बंद केल्याचे दिसून येत आहे.

सदर महामार्गावर येण्यासाठी असलेल्या सर्व पादचारी मार्गावर व रोडवर नालीचे बांधकाम दुतर्फा करण्यात आले असल्यामुळे त्या सर्वच रोडवर व परिसरात दोन फूट ते आठ फूट उंचीपर्यंत नालीचे बांधकाम केले असल्यामुळे हजार ते 2000 रहिवाशांचे अतोनात जीव घेणे हाल होत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, जुन्या महामार्गावर काही ठिकाणी फुल बांधण्यात आलेले होते; पण नवीन महामार्गाच्या बांधकामात हे फुल दिसून येत नाहीत. त्यामुळे हे पुल कुठे गायब झाले हेही एक न उघडणारे कोडे असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी या नालीचे बांधकाम उंच झाल्यामुळे आपल्या वाहनासहित दोन्ही बाजूच्या रहिवाशांना घरापर्यंत वाहने घेवून जाणे शक्य होत नसल्यामुळे आपले वाहने रोडच्या कडेला पार्किंग करुन घरी जावे लागत आहे.

हेही वाचा :   

Back to top button