Marathwada Gram Panchayat Election Result Update : मराठवाडा ग्रामपंचायत निवडणूक निकाल वाचा लाइव्ह अपडेट | पुढारी

Marathwada Gram Panchayat Election Result Update : मराठवाडा ग्रामपंचायत निवडणूक निकाल वाचा लाइव्ह अपडेट

पुढारी ऑनलाइन डेस्क : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील एकूण 2159 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यापैकी अनेक ठिकाणी मतमोजणी सुरू झाली असून लोक निकाल ऐकण्यासाठी खूप उत्सूक आहेत. जालना जिल्हातील ग्रामपंचायतीचे निकाल शिंदे गटाच्या बाजूने येत असून मरावाड्यातील 30 टक्के ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकणार, असा दावा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केला आहे. औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यातील 2159 ग्राम पंचायतींचे निकाल लाइव्ह अपडेट वाचा :

Marathwada Gram Panchayat Election Result Update :

परभणी अपडेट्स :

गंगाखेड तालुका –

ग्रामपंचायत निवडणूक – ११
बिनविरोध – घटांग्रा, भांबरवाडी
सद्यस्थितीत उपलब्ध माहिती –
१.सिरसम – सरपंच विमलबाई व्यंकटराव केंद्रे + सर्व ०७ जागा (भाजपा, नेतृत्व संतोष मुरकुटे)
२. पिंपरी – सरपंच सुमनबाई भारत भिसे + ०५ सदस्य एकुण जागा ०९ (रासप/ आ गुट्टे मित्रमंडळ नेतृत्व प्रल्हाद मुरकुटे माजी जि प सदस्य)
३. शंकरवाडी – सरपंच दत्तराव मुलगीर + सर्व ०८ जागा ( शिवसेना, नेतृत्व खा. संजय जाधव/ पॅनल प्रमुख बालासाहेब दरेकर).

औरंगाबाद अपडेट्स

पैठण : पहिल्या फेरीमध्ये पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे सरपंच पदाचे दोन उमेदवार विजयी झाले असून तर राष्ट्रवादीचे एक उमेदवार विजय झाला आहे. संपूर्ण बातमी वाचा या खालील लिंकवर-

Aurangabad Gram Panchayat Election : संदिपान भुमरे गटाचे दोन; राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी

उस्मानाबाद अपडेट्स :

उस्मानाबाद : सर्वच पक्षांना संमिश्र यश, कार्यकर्त्यांचा जल्‍लोष

ठाकरे गट, भाजप, महाविकास आघाडीचा जल्लोष

उस्मानाबाद : जिल्ह्यातील 165 ग्रामपंचयातीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून अनेक मोठ्या गावांमध्ये अनपेक्षित निकाल लागले आहेत. सारोळा, तेर या आमदारांच्या गावांनी नेत्यांची प्रतिष्ठा राखली असून कसबे तडवळे, पाडोळी (आ.), मोहा येथे धक्‍कादायक निकाल लागले आहेत. दरम्यान, विजयी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्‍लोष सुरु केला आहे.

आतापर्यंतचे दृष्टीक्षेपात निकाल :

कळंब तालुक्यातील खामसवाडी बाळासाहेबांची शिवसेना सरपंच अमोल पाटील विजयी
आमदार कैलास पाटील गटाचे सारोळा उध्दव ठाकरे गटाचे संपुर्ण पॅनल विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे
उस्मानाबाद तालुक्यातील उपळा राष्ट्रवादी व काँग्रेस पार्टीच्या गटाचे सुहास घोगरे
उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी कोंबडवाडी ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील रुइभर ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील शिंगोली ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी
ढोकीत 17 जागेपैकी 12 काँग्रेस व सरपंच विजयी तर भाजप 5 जागा
उस्मानाबाद तालुक्यातील अंबेजवळगा ग्रामपंचायत निवडणूक
भाजप सरपंच विजयी, ११ सदस्य विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील कामेगाव भाजपाचे सरपंचपदी वाघमारे
कळंब तालुक्यातील उध्दव ठाकरे गटाचे वाघोली साखरबाई काळे विजयी
कळंब तालुक्यातील मोहा भाजपाचे सरपंच पदाचे संदिप मडके विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील शेकापुर शिंदे गटाचे सरपंच पदाचे किरण लगदिवे विजयी
किणी सरपंच पदाचे अंजली पाटील विजयी
तेर भाजप दहा जागा महा विकास आघाडी सात सरपंच भाजपाचा विजयी
कळंब तालुक्यातील आंदोरा सरपंच पदाचे उध्दव ठाकरे गटाचे बळवंत तांबारे विजयी
उस्मानाबाद तालुक्यातील उध्दव ठाकरे गटाचे अमोल अप्पा मुळे यांची जुणोनी गावच्या सरपंच पदी विजयी
करंजकल्ला : उद्ववसेना 6, भाजप 3, सरपंच उद्ववसेना विजयी
कळंब लोहटा पुर्व ग्रामपंचायत वर शिवसेनेचा भगवा
मोहा : युवा परिवर्तन 16पैकी 16 जागा जिंकल्या
लोहटा पुर्व ग्रामविकास पॅनलचे
नूतन सरपंच ऋषी भिसे
कळंब डिकसळ सरपंच पुष्पा धाकतोडे विजयी ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात 18 पैकी 18 जागेवर विजयी
तडवळा सरपंचपदी स्वाती विशाल जमाले, सुरेश पाटील यांचा पराभव
जुणोनी वलगुड झरेगाव ग्रुप ग्रामपंचायत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे
आम आदमी पार्टीचे अजित खोत कावळेवाडीचे सरपंच
वाखर वाडी ग्रामंचायत ठाकरे शिवसेना सरपंच सहित सर्व विजयी
गोरेवाडी चे नूतन सरपंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रीतम नाडे

बीड अपडेट्स :

*सुगाव:-बंडू मारुती शिंदे सरपंचपदी विजयी
* सेलू आंबा: ललिताबाई भगवान औताडे सरपंचपदी विजयी
*वाघाळा -भाजप -सरपंच -सविता भगत
*येलडा राजुबाई भानुदास करणल सरपंच पदी विजयी
*ममदापुर (परळी) रमेश मोतीराम मुंडे सरपंच पदी विजयी (राष्ट्वादी) *घाटनांदूर:-महेश अप्पा गराटे सरपंच पदासाठी विजयी
*मुरंबी शितल बाबुराव जगताप सरपंचपदासाठी विजयी
*नवाबवाडी कल्पना गोदाम सरपंचपदासाठी विजयी (भाजप)
*तळणी शुभम संभाजी गित्ते सरपंचपदासाठी विजयी
*तेलघना महेश महादेव सिरसाट सरपंच पदासाठी विजयी
*वरवटी सुधीर चाटे सरपंचपदासाठी विजयी
*पूस ज्ञानेश्वरी लक्ष्मीकांत पवार सरपंचपदासाठी विजयी

गेवराई ग्रामपंचायत निवडणूक निकाल

जातेगांव – बंडु पवार – शिवसेना
तळणेवाडी – सुभाष धस – शिवसेना
अंतरवाली – दिपक वावरे – भाजपा
रूई – कालिदास नवले – शिवसेना
पांचाळेश्वर – राष्ट्रवादी
वडगावं ढोक – सचिन ढाकणे -राष्ट्रवादी
मालेगावं बु – बबन बोर – राष्ट्रवादी
माटेगावं- शितल आरबड -राष्ट्रवादी
सुशी – राष्ट्रवादी
राक्षसभुवन- उषा कोंढरे -भाजपा
धानोरा – अविनाश राऊत -राष्ट्रवादी
राजापुर -भास्कर गवते – राष्ट्रवादी
मिरगांव -भिमराव झाकणे

केज तालुक्यातील टाकळी येथे केज पंचायत समितीच्या सभापती परिमाताई घुले आणि त्यांचे पती भाजपचे नेते विष्णू घुले यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव झालेला असून बजरंग बप्पा सोनवणे यांच्या गटाचे नारायण घुले आणि युवा नेते श्रीकांत घुले यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालेला आहे भाजपला हा मोठा फटका बसलेला आहे

पहिल्या फेरीतील निकाले सत्ताधारी गटाच्या विरोधात लागलेले असल्याचे दिसून येते

ग्रामपंचायत निवडणूक दुसरी फेरी निवडून आलेले सरपंच उमदेवार

१)मिरकाळा :लक्ष्मण पवार
२) सुशी:- अमरसिंह पंडित
३)सैदापुर :- अमरसिंह पंडित
४)मालेगांव खु: अमरसिंह पंडित
५)राक्षसभूवन :- लक्ष्मण पवार
६)बोरी पिंपळगाव : अमरसिंह पंडित
७) माटेगाव : अमरसिंह पंडित
८)मिरगाव :-अमरसिंह पंडित
९ )राजापुर :अमरसिंह पंडित
१०)धानोरा:अमरसिंह पंडित

नागझरी येथून चंदू चौरे यांचा पॅनल विजयी

टाकळीमध्ये विष्णू घुले यांच्या पॅनलचा पराभव

साबला येथे नरहरी काकडे यांचा पॅनल विजयी

कळंबा येथून सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार विजयी

कुंबेफळ येथून बंडू थोरात यांचा पॅनल विजयी

बीड : केज तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतीच्या एकूण पाच फेऱ्यात मतमोजणी होत आहे पहिली फेरीत 14 ग्रामपंचायततीची मतमोजनी सुरू

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील ९ ग्रामपंचायत निकाल जाहीर ; आठ गावचे कारभारी शिंदे गटाचे उमेदवार विजयी तर एका ठिकाणी धोत्रा भाजपाचा कारभारी.
१- कासोद – धामणी — दत्तात्रय काशिनाथ राकडे
२- बोरगाव बाजार – सय्यद सत्तार बागवान
३ – सारोळा – मोहन गायकवाड
४ – जांभई – लक्ष्मीबाई नारायण शिंदे
५ – रेलगाव-पंकज जैस्वाल
६-खुल्लोड-स्वाती भोरकडे
७-जलकी बाजार-ज्ञानेश्वर दांडगे
८-धोत्रा-पदमाबाई जाधव(भाजपा)
९-मोढा खु-लक्ष्मण कल्याणकर

भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे यांनी गड राखला. बोरगांव कासारीत सरपंच पदासह भाजपचे वर्चस्व

पालकमंत्री संदिपान भुमरे यांना आडुळ सरपंच पदासाठी दे धक्का… महाविकास आघाडीचे सरपंच बबन भावले विजय

ग्रामपंचायत निवडणूक
गेवराई मतदारसंघातील सरपंच पदाचे विजय उमदेवार

१)वडगाव ढोक ढाकणे :अमरसिंह पंडित
२)टाकळगव्हाण अमरसिंह पंडित
३)काजळा :- बदामराव पंडित
४)मालेगांव बू: अमरसिंह पंडित
५)पांचाळेश्वर :- अमरसिंह पंडित
६)तळणेवाडी : बदामराव पंडित
७) अंतरवली : लक्ष्मण पवार
८) जातेगाव :-बदामराव पंडित
९ )रुई :- बदामराव पंडित

कन्नड तालुका – आता पर्यंत नऊ ग्राम पंचायत निकाल –

आडगाव जेहुर व सरपंच सविता दादासाहेब शिंदे

बहिरगाव – डॉक्टर केशव कचरू शिरसे

भारंबा – प्रवीण दामोदर शिंदे

आडगाव पी – केंदाळे रिता जनार्दन

भोकनगाव – हिराबाई कडबा घोरपडे

ब्राह्मणी – गौतम रंगनाथ पवार

भीलदरी – शोभा ईश्वर कोटवाळे

भारंबा तांडा – वंदना ज्ञानेश्वर राठोड

चिंचखेडा – कांताबाई नारायण सातदिवे

हे सरपंच पदी निवडून आले आहे

टाकळी येथून भाजपच्या सुनीता अनंत घुले या सरपंचपदी विजयी

नागझरी चंद्रसेन चौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंचपदी विजयी

 

 

Back to top button