Python found in Washim : ९ फूट लांबीच्या अजगराला जीवदान; रासोयोच्या बचाव पथकाला यश | पुढारी

Python found in Washim : ९ फूट लांबीच्या अजगराला जीवदान; रासोयोच्या बचाव पथकाला यश

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : वनोजा येथील नितीन इंगोले या शेतकऱ्याच्या शेतात ९ फूट लांबीचा अजगर आढळून आला. शेतातील विहिरीजवळ त्यांना हा अजगर आढळून आला. घटनेची माहितीची समजताच श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाच्या सदस्यांनी घटनास्थळी दाखल झाली. (Python found in Washim)

याबाबतच्या अधिक माहितीनुसार आदित्य इंगोले हे आपले सहकारी सर्पमित्र शुभम हेकड, सौरव इंगोले यांच्यासह घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. यावेळी त्यांना अंदाजे ९ फुट लांबीचा अजगर आढळून आला. हा अजगर अतिशय तापट स्वभावाचा होता असे या बचाव पथकाला आढळून आले. बचाव पथकाच्या प्रयत्नानंतर या अजगराला सुरक्षितरित्या रेस्क्यू करण्यात आले. (Python found in Washim)

या घटनेची माहिती कारंजा-मंगरूळपीर वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी अमित शिंदे यांना व वनरक्षक दिघोडे यांना दिली. वनपाल नवलकर यांच्या उपस्थितीत याचा पंचनामा करुन या अजगराला वनोजा येथील वनपरिक्षेत्रात सोडण्यात आले. यावेळी रासेयो पथकाचे नयन राठोड, प्रविण गावंडे तसेच सहकारी सौरव इंगोले शुभम हेकड व वनविभागाचे डाखोरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button