

पैठण, चंद्रकांत अंबिलवादे : आषाढीवारीच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यातील ढोरकिन येथे रविवारी रोजी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पथकाने छापा मारून ४ लाख ५९ हजार रुपये किंमत असलेल्या ३९ गोवंश जप्त केले. तर आठ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच जप्त करण्यात आलेल्या गोवंश गोशाळेत ठेवण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, पैठण तालुक्यातील सर्वाधिक मोठा कत्तलखाना म्हणून ओळख असलेल्या ढोरकिन येथे रविवारी दि.२५ रोजी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने कत्तलखान्यावर छापा मारला. या ठिकाणी गाईचे शिर कापून बाजूला ठेवून इतर रात्रीच्या अंधारात कुराडच्या मदतीने मास कापीत असताना आढळून आले.
यावेळी या शेडमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या गोवंश बांधून ठेवण्यात आले होते. मास विक्रीचा कृत्य करणा-या सर्वांना ताब्यात घेवून ४ लाख ५९ हजार रुपये किंमत असलेल्या गोवंश ताब्यात घेतले. यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.