हिंगोली : रेल्वे प्रश्नी हिंगोलीकर आक्रमक; व्यापारी, राजकीय पक्ष व संघटनांची बनली वज्रमूठ | पुढारी

हिंगोली : रेल्वे प्रश्नी हिंगोलीकर आक्रमक; व्यापारी, राजकीय पक्ष व संघटनांची बनली वज्रमूठ

हिंगोली, पुढारी वृत्‍तसेवा : रेल्वे प्रश्नावर हिंगोली येथे व्यापारी, राजकीय, सामाजिक संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये रेल्वे प्रश्नावर जिल्हा बंद व रेल्वे रोको अंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

हिंगोली मार्गे जाणारी जालना – छपरा एक्सप्रेस वळविण्यात आली आहे. ही रेल्‍वे पूर्णा – हिंगोली- मार्गानेच सुरू करण्यात यावी तसेच वाशिम – हिंगोली या रेल्वे मार्गावर मुंबईला जाण्याकरता एक ही रेल्वे नसल्याने मुंबईसाठी रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच रेल्वे स्टेशन परिसरात रिकामी जागा असल्याने त्या ठिकाणी व्यापा-यासाठी शेड उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. वसमत रेल्वे स्टेशनवरील प्लॕटफॉर्मचा वापर केला जात नाही तर दुस-यांचेही पुनर्निर्माण करून सर्व सुविधायुक्त प्लॅटफॉर्म निर्माण करावे.

या विविध मागण्या घेवून हिंगोली जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणारच असल्याचे व्यापारी, विविध राजकीय सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शिकामोर्तब करण्यात आले आहे. ह्या आंदोलनात सहभागी होण्याकरता आवाहण करण्यात आले आहे.

हेही वाचा

एसटीच्या संकटकाळात धावून आलेले कंत्राटी चालक वाऱ्यावर; ८०० चालकांवर उपासमारीची वेळ

नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

‘मराठी सिनेमाला एका शो साठी झगडावं लागत असेल तर’……..हेमंत ढोमे कडाडला

 

Back to top button