हिंगोली : सेनगाव येथे शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपालांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

हिंगोली : सेनगाव येथे शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपालांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

सेनगाव, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सेनगाव येथे शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वतीने  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सदेश देशमुख यांच्यासह शिवसैनिक आक्रमक झाले होते. छत्रपती चौकात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर विविध राजकीय स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. भगतसिंह कोश्यारी आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडत आहेत. काही महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल चुकीचे विधान केल्यामुळे राज्यभरातून निषेध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करून एका नव्या वादाला फोडणी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाला विरोधकांना तोंड द्यावे लागत आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?

मराठवाडा विद्यापीठाकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मानद डि. लिट पदवी प्रदान करण्यात आली. या वेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना थेट नितीन गडकरी यांच्याशीच केली. "शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श आहेत. मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत सगळे तुम्हाला इथेच मिळतील, असे कोश्यारी म्हणाले होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news