जालना : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यभर वादंग सुरू आहे. अशात जालना जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या रेखा तौर यांनी सत्तार यांचे कपडे फाडणार्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांकडूनदेखील आता पातळी सोडून टीका केली जात असल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.