बीड : पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार | पुढारी

बीड : पतीनेच करायला लावला पत्नीवर अत्याचार

माजलगाव, पुढारी वृत्तसेवा : स्वत:च्याच पत्नीला अनोळखीच्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याची घटना २६ जुलै २०२२ रोजी घडली. दरम्यान पीडीत पत्नीने याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पतीसह नराधम व्यक्तीविरोधात गुरुवारी (दि.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाशेद इनामदार व नासेर शेख (महिलेचा पती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, २६ जुलै २०२२ रोजी माजलगाव तालुक्यातील एका विवाहित महिलेच्या घरात बाशेद इनामदार नामक व्यक्ती घुसला व त्या महिलेसोबत शरीर संबंध प्रस्थापित करण्याची मागणी करू लागला. हा सर्व प्रकार महिलेच्या पतीसमोर घडत होता. दरम्यान महिला आरडा ओरड करू लागली. त्यावेळी बाशेद इनामदार याने आरडा ओरड केलीस तर तुझ्या मुलांना मारून टाकेन, अशी धमकी दिली व महिलेवर जबरदस्ती अत्याचार केला.

हा प्रकार अनेक दिवस घडत होता. दरम्यान यावेळी विवाहितेचा पती नासेर शेख हा घरातून निघून जात होता. बाशेद इनामदार हा पीडित महिलेच्या मनाविरुद्ध राजरोस अत्याचार करत असे. दरम्यान पीडित महिलेने या अन्यायाला प्रत्यक्ष ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत २ नोव्हेंबर २०२२ रोजी वाचा फोडली. दरम्यान या प्रकरणातील दोन्ही आरोपी फरार आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button