शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पेटती मशाल घेऊन रस्त्यावर! | पुढारी

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी पेटती मशाल घेऊन रस्त्यावर!

सोनपेठ; पुढारी वृत्तसेवा : मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात आणि सोनपेठ तालुरक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतातील उभे पीक हातून गेले आहे. यातच कंपनीच्या मारक धोरणामुळे शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही? या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहे. यावर्षी पावसाचा खंड पडून झालेले नुकसान वेगळेच असताना उरले – सुरले पीकही शेतकऱ्यांच्या हातून जात आहे. शेतकऱ्यांना तत्काळ पीकविमा देण्याची मागणी तालुकाप्रमुख भगवान पायघन यांनी बोलताना केली. यावेळी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शिवसैनिक पेटती मशाल घेऊन रस्त्यावर उतरले होते.

यावेळी, पायघन यांनी हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण हा दिवाळी आहे. दिवाळीच्या तोंडावर पडलेला परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या मुळावर आला त्यामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे .या सर्व बाबीची दखल घेऊन सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनासाठी सोनपेठचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी,पोलीस उपनिरीक्षक मंचक फड,यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान देण्यात आलेल्या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख मधुकर निरपणे, तालुकाप्रमुख भगवान पायघन, शहरप्रमुख कृष्णा पिंगळे, माजी तालुकाप्रमुख रंगनाथ रोडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश जाधव, तालुकाप्रमुख संतोष गवळी, नवनाथ क्षीरसागर, पांडुरंग कदम, विलास कदम, रामेश्वर पोते यांच्यासह शिवसैनिक, युवसैनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा;

Back to top button