औरंगाबाद : दिवाळीनंतर एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती येणार

औरंगाबाद : दिवाळीनंतर एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती येणार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे आणि एसटी कर्मचार्‍यांच्या संपामुळे महिला चालकांच्या प्रशिक्षणाला ग्रहणच लागले. त्यांच्या हाती एप्रिल-2021 मध्येच एसटीचे स्टेअरिंग येणार होते, परंतु दरम्यान चार महिला चालकांचे प्रशिक्षण सुट्यांमुळे लांबल्याने आता त्यांच्या हाती स्टेअरिंग दिवाळीनंतरच येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

एसटी महामंडळाने प्रथमच महिला चालकांच्या हाती स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिला चालकांची भरतीही केली. त्यांतील 32 महिला चालकांच्या प्रशिक्षणाला औरंगाबादेत फेब-ुवारी-2020 मध्ये सुरुवातही झाली. प्रशिक्षणादरम्यान महिला उमेदारांनी एक वर्षभरानंतर आपल्या हाती एसटीचे स्टेअरिंग येणार, या उत्साहात भरपूर मेहनत घेणे सुरू केले होते. हा आनंद त्यांचा औटघटकेचाच ठरला.

कोरोनाचा कहर तब्बल वर्षभर चालला. यातून सावरत पुन्हा प्रशिक्षणाला सुरुवात झाली. अशातच एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू झाला. हा संप तब्बल पाच महिने चालला, यामुळे पुन्हा त्यांचे प्रशिक्षण रखडले. संप मिटताच प्रशिक्षणाला सुरुवात झाली आणि चार महिला वगळता इतरांचे प्रशिक्षण अखेर पूर्ण झाले. प्रशिक्षण पूर्ण झाले असले, तरी त्यांच्या हाती दिवाळीनंतरच स्टेअरिंग येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news