Kidnapping : पैशाच्या व्यवहारातून व्यक्तीचे अपहरण | पुढारी

Kidnapping : पैशाच्या व्यवहारातून व्यक्तीचे अपहरण

केज पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील आंधळ्याची वाडी येथून तिघांनी एकाला इसमाचे स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण (Kidnapping) केले. या प्रकरणी अपहृताच्या पत्नीच्या तक्रारीवरून चौघां विरुद्ध अपहरणाचा व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे.

साहेबराव शिंदे (हंगेवाडी ता. केज), असे अपहण केलेल्या व्यक्तिचे नाव असून बाबासाहेब किसन आंधळे यासह मुले आणि पत्नी असा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साहेबराव शिंदे यांची पत्नी पुष्पा शिंदे यांनी केज पोलिसांकडे तक्रार दिली.

या बाबतची माहिती अशी की, शनिवारी (दि. १५)  दुपारी ४:००  वाजता हंगेवाडी (ता. केज) येथील अपहृत साहेबराव शिंदे व त्याची पत्नी पुष्पा शिंदे यांना आंधळेवाडी येथील बाबासाहेब किसन आंधळे, त्यांचा मुलगा व पत्नी यांनी आंधळेवाडी येथील मुंज्याच्या माळावरील धाब्यावर बोलावून घेतले. तिथे त्यांना पैशाच्या कारणावरून शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर साहेबराव शिंदे यांना एका स्कॉर्पिओ गाडीत बळजबरीने घातले आणि अपहरण केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

Kidnapping : अपहरण करणे व जीवे मारण्याची धमकी

या प्रकरणी अपहृत साहेबराव शिंदे यांची पत्नी पुष्पा साहेबराव शिंदे यांच्या तक्रारी वरून बाबासाहेब किसन आंधळे, बाबासाहेब किसन यांचा मुलगा आणि पत्नी (रा. आंधळेवाडी ता. केज) या चौघां विरुद्ध मारहाण करून अपहरण करणे व जीवे मारण्याची धमकी दिली; या कारणास्तव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार उमेश आघाव हे अपहरण प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button