वाशीम : डिक्कीतून पळवलेली ७ लाखांची रोकड जप्त; १२ तासांच्या आत चोरटे जेरबंद | पुढारी

वाशीम : डिक्कीतून पळवलेली ७ लाखांची रोकड जप्त; १२ तासांच्या आत चोरटे जेरबंद

वाशीम: पुढारी वृत्तसेवा : दूध घेण्यासाठी थांबल्याचे पाहून दुचाकीच्या डिक्कीत पिशवीत ठेवलेली ८ लाख २५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार सोमवारी (दि.१०) घडला. दरम्यान, पोलिसांनी दोघा चोरटयांना १२ तासांच्या आत ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ७ लाख २० हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी प्रकाश धमानी (रा. सिंध्दी कॅम्प, वाशीम) यांनी फिर्याद दिली. शंकर चांदवाणी (रा. सिंध्दी कॅम्प, वाशीम) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक अशी की, १२ ऑक्टोबर रोजी प्रकाश धमानी फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यांनी त्यांच्या व्यवसायाकरीता मल्टीपल कॅमेरा घेण्याकरीता ८ लाख २५ हजार रुपये जमा केले होते. सोमवारी (दि.१०) ते आपल्या दुकानात पैसे मोजत होते. यावेळी तेथे आरोपी शंकर चांदवाणी दुकानावर आला. काही वेळ तेथे थांबून परत गेला. त्यानंतर फिर्यादी हे पैसे घरी ठेवण्यासाठी मोटरसायकलवरून (क्रं. एम एच ३७ एए ८११६) निघाले. त्यांनी गाडीच्या डिक्कीमध्ये एका पिशवीमध्ये पैसे ठेवले होते.

दरम्यान, गोदावरी दूध डेअरीजवळ मोटारसायकल उभी करून ते दूध घेण्यासाठी गेले. त्यावेळी आरोपी शंकर चांदवाणी डिक्कीतील रक्कम घेऊन पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. त्यानंतर फिर्यादी व नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

याप्रकरणी वाशीम पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी (दि.१२) फिर्यादीने तक्रार दाखल केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस नाईक अमोल इंगोले, श्रीराम नागुलकर, किशोर खंडारे यांच्या पथकाने तपास सुरू केला. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शंकर गोविंदराम चांदवाणी आणि त्याचा साथीदार मनोज शिंदे या दोघांना सेक्युरा हॉस्पीटलमागून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्हयातील एक मोटार सायकल (एम एच ३७ एए ८११६) किंमत ५०,००० रु व नगदी ६ लाख ७० हजार असा एकूण ७ लाख २० हजार रुपये जप्त करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चनसिंह, अप्पर पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांचे पथकातील पोलीस उपनिरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस नाईक अमोल इंगोले, श्रीराम नागुलकर, पोकॉ किशोर खंडारे यांनी केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button