हिंगोली : पिकविमा नाकारल्याने आमदार बांगरांची विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड | पुढारी

हिंगोली : पिकविमा नाकारल्याने आमदार बांगरांची विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी गुरूवारी शेतकर्‍यांचा पिकविमा नाकारणार्‍या कंपनीच्या कार्यालयात तोडफोड करीत अधिकार्‍यांना दम दिला. तसेच पिकविमा न देणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावे, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर शेतकर्‍यांनी पिकविमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी नोंदविल्या. मात्र विमा कंपनीने काही तक्रारी मुदतीनंतर आल्या तर काही ठिकाणी अतिवृष्टी झालीच नसल्याचे कारण देत नुकसानग्रस्तांच्या तक्रारी फेटाळून लावल्या. सुमारे ३० हजारांपेक्षा अधिक तक्रारी फेटाळून लावल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांना याबाबतची माहिती दिली. आमदार बांगर यांनी गुरूवारी शेतकऱ्यांसह विमा कंपनी कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात कंपनीचे कर्मचारी उपस्थीत नसल्याने बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यानंतर बांगर यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची घेतली. विमा कंपनीकडून शेतकर्‍यांना अडचणीत आणले जात असून कंपनीच्या अधिकार्‍यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख राम कदम, पिंटू पतंगे, प्रकाश दराडे, गुड्डू बांगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button