तुळजापूर : पाच लाख भाविक तुळजा भवानीच्या दारी | पुढारी

तुळजापूर : पाच लाख भाविक तुळजा भवानीच्या दारी

तुळजापूर :  कोजागिरी पौर्णिमेचा दोन दिवसाचा योग बहुसंख्य भक्तांच्या लक्षात न आल्याने रविवारीच (दि. 9) कोजागिरी पौर्णिमा समजून राज्यासह, परराज्यातून विशेषतः सोलापूर शहर, जिल्हा परिसरातून भाविकांच्या गर्दीचे तुफान लोंढे तुळजापुरात दाखल झाले. मातेचा निद्राकाळ सुरू असतानाच अनेक भाविक धार्मिक विधी पार पाडताना दिसत होते. सोमवारी मध्यरात्रीनंतर मातेची मुख्य मूर्ती सिंहासनाधिष्ठीत केली जाणार आहे. शनिवारी सायंकाळपासून रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत किमान निम्मे भाविक देवीदर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागल्याचे दिसत होते.

कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा सोमवारी (दि. 10) साजरा केला होत आहे. आज रविवारी कोजागिरी पौर्णिमेचा योग साधत लाखों भाविक पायपीट करीत तुळजापुरात पोहचले. गेल्या बुधवारी पहाटे सिमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली मातेची पाच दिवसांची श्रमनिद्रा सोमवारी (दि. 10) पहाटे संपत आहे. दरम्यान, सोलापूरच्या मानाच्या काठ्या व पालखीचे मंदिरात उद्या (सोमवारी) आगमन होत आहे. या काठ्यांना देवीच्या छबिना मिरवणुकीपूढे मानाचे स्थान असतेे. मानाच्या काठ्यांसह मातेची छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Back to top button