

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईकडे निघालेल्या वाहनांचा मंगळवारी (दि.४) सायंकाळी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. ८ ते १० वाहने एकमेकांवर जाऊन जोरात आदळली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, भरधाव निघालेली वाहने दौलताबादजवळ एकमेकांवर आदळली. ही वाहने जालना जिल्ह्यातील आहेत. एका कारचालकाने अचानक गती कमी केल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात कोणतीही जिवित हानी झालेली नाही.
हेही वाचलंत का ?