औरंगाबाद : राज्यातील एकमेव ऐतिहासिक हरसिद्धी माता मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम | पुढारी

औरंगाबाद : राज्यातील एकमेव ऐतिहासिक हरसिद्धी माता मंदिरात नवरात्रीनिमित्त विविध उपक्रम

औरंगाबाद; पुढारी ऑनलाईन : औरंगाबादेतील हर्सुल या गावात स्थीत हरसिद्धी माता सर्वच मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे. राज्यात देविचे हे एकमेव मंदिर आहे. पहले मंदिर उज्जैन येथे आहे. या मंदिराला ऐतिहासिक असा वारसा आहे. राजा चक्रवर्ती सम्राट विक्रमादित्य भारताची प्राचीन नगरी उज्जैन राज सिंहासनावर विराजमान होते. त्यांची हरसिद्धी माता अराध्य दैवत होते. हरसिद्धी माता प्रसन्न झाल्यानंतरच राजा विक्रमादित्य यांनी जगावर राज्य केले. भारतातील पहिले हरसिद्धी मातेचे मंदिर उज्जैन येथे आहे व दुसरे मंदिर औरंगाबादेतील हर्सुल येथे आहे. चारफूट आकाराच्या मातेची मूर्ती मध्यप्रदेशातील कारागिरांनी साकारलेली आहे. हे मंदिर कसे तयार झाले, यालाही ऐतिहासिक पाश्वभूमी आहे.

राजा विक्रमादित्य संस्थापक ११११ साली तत्कालीन खडकी येथे कामानिमित्त आले होते. त्यावेळी विक्रमादित्य राजास हर्सूलमध्ये मुक्काम ठोकावा लागला होता. त्यांना हा परिसर अधिकच भावल्याने येथे मंदिर बांधण्याचा निश्चय त्यांनी केला व हरसिद्धीमाता येथे विराजमान झाली. अशी माहिती ट्रस्टचे संजय हरणे यांनी दिली.

प्राचीन मंदिरांसह सूर्य, चंद्र, रामकुंड

हरसिद्धी मातेच्या गाभाऱ्यापुढे सूर्य कुंड तर समोरच रामकुंड व रेणुकामाता, महादेवापुढे रामकुंड आहे. चंद्रकुंडाने १९७२ च्या दुष्काळात संपूर्ण हर्सूलगावाची तहान भागविली होती. कार्तिक पोर्णिमाला येथे हरसिद्धी मातेची मोठी यात्रा भरते. याचा परिसरात सतीची तीन मंदिरे, दीपमाळ, लक्ष्मीनारायणाचीही स्थापना केली आहे. येथे असलेल्या महादेवाच्या पिंडीसमोरील नंदी हा महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा प्राचीन नंदी म्हणून ओळखला जातो. येथे नवरात्रात विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येतात, कार्तिक पौर्णिमेस मोठी यात्रा भरते. ज्यात पशू प्रदर्शन, महाराष्ट्रातील कुस्ती साठी हर्सुल हरसिद्धि यात्रा प्रसिद्ध आहे.

Back to top button