तुळजाभवानी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्‍ठापित | पुढारी

तुळजाभवानी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्‍ठापित

तुळजापूर ; पुढारी वृत्तसेवा घटस्थापनेच्या मध्यरात्री एक वाजता तुळजाभवानी देवीची 17 सप्टेंबर पासून सुरु झालेली निद्रा पूर्ण झाली. विधिवत आणि परंपरागत पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या भोपे पुजारी बांधवांनी देवीची मूर्ती पलंगावरून मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली.

तुळजाभवानीची घोरनिद्रा पूर्ण होऊन एक वाजता तुळजाभवानी देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली. त्याप्रसंगी गुलाबी साडी देवीला घातली होती. त्यानंतर सकाळी सात वाजता अभिषेक, महापूजा करण्यात आली.

तुळजाभवानीच्या मंदिर परिसरात रात्रभर भाविकांची गर्दी कायम होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा :  

Back to top button