लातूर : निटुरात लंपीच्या लसीकरणाला सुरुवात | पुढारी

लातूर : निटुरात लंपीच्या लसीकरणाला सुरुवात

निटूर; विजय देशमुख :  निटुरात लंपीचा शिरकाव, पशुपालकात चिंतेचे वातावरण या मथळ्याखाली दै. पुढारीने 16
सप्टेंबरच्या अंकामध्ये वृत्त प्रकाशित केले होते निटूर येथील एका शेतकर्‍यांच्या पशूधनाला लंपीची लागण झाल्याचे वृत्त
प्रकाशित झाल्यानंतर पशुवैद्यकीय विभागाने निटूरमध्ये पशूधनाच्या लसीकरणास सुरुवात केली आहे.

निटूरमध्ये शुभम कनशेट्टे यांच्या बैलाला लंपी संसर्गाचे लक्षणे आढळली होती त्या संदर्भात दै. पुढारीने वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान सोमवार सायंकाळी जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी निलंगा
पशूधन विभागाला निटूर व परिसरातील पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावामध्ये लसीकरण करण्यास सांगितले.
त्यामुळे पशूधन विभागाने तत्काळ लसीकरणाची तयारी करून बाहेरील कर्मचारी मागवून निटूरमध्ये तीन ठिकाणी
लसीकरणाची व्यवस्था केली असून चार कर्मचारी सकाळपासून लसीकरण करत आहेत. निटूरमध्ये नोंदनीकृत असे
गायवर्गीय लहान मोठे मिळून सहाशे बासस्ट पशूधन आहेत. त्या सर्वांवर लसीकरण करण्यात येणार आहे.अगोदरच कोरोना व त्यात यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी धास्तावला असताना आता लंपीमुळे त्रस्त आहे, मात्र पशूधन विभागाने लसीकरण सुरू केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

सोमवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी निलंगा पशूधन विभागाला निटूर व परिसरामध्ये पाच किलोमीटर अंतरापर्यंत तत्काळ लसीकरण करण्यास सांगितले त्यावरून आम्ही रात्री उशिरा लसीचा साठा ताब्यात घेऊन बाहेरील कर्मचारी मागवून सकाळी सात वा. निटूरमध्ये लसीकरण सुरू केल्याचे पशूधन अधिकारी निंबाळकर यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.

Back to top button